maharashtra

महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाकडून एकास अटक


One arrested by Maharashtra Goods and Services Tax Department
महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाकडून केलेल्या अन्वेषणात मुंबई येथून अत्ताउल्हा मोहम्मद नईम चौधरी या व्यक्तीस अटक करण्यात आली असल्याची माहिती राज्यकर उपआयुक्त (जनसंपर्क) यांनी दिली आहे.

मुंबई : महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाकडून केलेल्या अन्वेषणात मुंबई येथून अत्ताउल्हा मोहम्मद नईम चौधरी या व्यक्तीस अटक करण्यात आली असल्याची माहिती राज्यकर उपआयुक्त (जनसंपर्क) यांनी दिली आहे.
महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाकडून केलेल्या अन्वेषणातून असे निदर्शनास आले, अत्ताउल्हा मोहम्मद नईम चौधरी नामक व्यक्तीने में. गौरी इस्पात, मे तेज स्टील, मे गजानन एंटरप्रायझेस या नावेमहाराष्ट्र वस्तू व सेवाकर कायदा, 2017 अन्वये नोंदणी करून GSTIN क्रमांक प्राप्त केले आहेत.
ही नोंदणीकृत व्यापारी संस्था प्रत्यक्ष खरेदी वा विक्रीव्यवहार न करता मोठ्या प्रमाणावर खोटी बिजके / देयके स्वीकारत व निर्गमित करत असल्याचे दिसून आले. संशयिताने विविध कंपन्यांकडून रु. 105 कोटी इतक्या रक्कमेची खोटी देयके व त्यायोगे, कोणत्याही मालाची प्रत्यक्ष देवाणघेवाण न होता रू. 18.91 कोटी इतक्या रक्कमेचा बोगस Input Tax Credit प्राप्त करून घेतला. त्यामुळे अत्ताउल्हामोहम्मद नईम चौधरी यांना मुंबई येथून अटक करण्यात आली आहे.
अतिरिक्त मुख्य महानगरदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने अत्ताउल्हा मोहम्मद नईम चौधरी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. महाराष्ट्र वस्तू वसेवाकर विभागाने करदात्यांस महाराष्ट्र वस्तू व सेवाकर कायद्यानुसार करभरणा व इतर बाबींची पूर्तता नियमितपणे करण्याबाबत आवाहन केले आहे.