maharashtra

सातारा बस स्थानकातून महिलेच्या पाटलीची चोरी


सातारा बस स्थानकातून महिलेच्या पाटलीची चोरी झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

सातारा : सातारा बस स्थानकातून महिलेच्या पाटलीची चोरी झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 28 डिसेंबर रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास रेखा भाऊसाहेब चव्हाण रा. सदर बाजार सातारा या सातारा ते मेढा जाणाऱ्या बसमध्ये चढल्या असता दरम्यान त्यांची 20 ग्रॅम वजनाची, 60 हजार रुपये किंमतीची सोन्याची पाटली अज्ञात चोरट्याने चोरून नेली. आहे याबाबतची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक फौजदार पवार करीत आहेत.