उंब्रज, तालुका कराड गावच्या हद्दीतून एका बोलेरोची अज्ञात चोरट्याने चोरी केली असल्याची फिर्याद उंब्रज पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
उंब्रज : उंब्रज, तालुका कराड गावच्या हद्दीतून एका बोलेरोची अज्ञात चोरट्याने चोरी केली असल्याची फिर्याद उंब्रज पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक ७ मे रोजी सहा वाजण्याच्या सुमारास उंब्रज तालुका कराड गावच्या हद्दीतील मार्केट यार्ड कमिटी येथील नितीन गोविंद दुधाने वय 37 राहणार उंब्रज तालुका कराड यांच्या गोडाऊन येथून त्यांची नऊ लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची पिकअप बोलेरो गाडी क्रमांक एम एच 11 टी 7077 अज्ञात चोरट्याने चोरून नेली असल्याची फिर्याद उंब्रज पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस नाईक सोरटे करीत आहेत.


