maharashtra

भाजून जखमी झालेल्या बालिकेचा मृत्यू


भाजल्याने जखमी झालेल्या बालिकेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

सातारा : भाजल्याने जखमी झालेल्या बालिकेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 13 फेब्रुवारी रोजी प्रीती यल्लाप्पा कांबळे वय 4, रा. दौलत नगर, सातारा या बालिकेच्या अंगावर राहत्या घरी पातळ भाजी पडल्याने ती भाजून जखमी झाली होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार राजगे करीत आहेत.