maharashtra

विकास सेवा सोसायटी, ग्रामपंचायतीसह सर्वच निवडणुकांना सामोरे जावा

ना. आदित्य ठाकरे यांच्या सूचना;  लवकरच युवा सेनेच्या पदाधिकार्‍यांच्या निवडी

Vikas Seva Society should face all elections including Gram Panchayat
सातारा जिल्ह्यात शिवसेनेने आपली पाळेमुळे खोल रुजवली असून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अलीकडील इतिहासात शिवसेनेचे २ संचालक निवडून आले आहेत. हे त्याचेच द्योतक असून भविष्यात विकास सेवा सोसायटी, ग्रामपंचायती, नगरपंचायती, पंचायत समिती, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांना धनुष्यबाणाच्या चिन्हावर सामोरे जावा अशा सूचना पर्यटनमंत्री, युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिल्या.

सातारा : सातारा जिल्ह्यात शिवसेनेने आपली पाळेमुळे खोल रुजवली असून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अलीकडील इतिहासात शिवसेनेचे २ संचालक निवडून आले आहेत. हे त्याचेच द्योतक असून भविष्यात विकास सेवा सोसायटी, ग्रामपंचायती, नगरपंचायती, पंचायत समिती, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांना धनुष्यबाणाच्या चिन्हावर सामोरे जावा अशा सूचना पर्यटनमंत्री, युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिल्या. दरम्यान ज्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा कालावधी संपला आहे, त्या ठिकाणी लवकरच नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या जातील, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले असल्याची माहिती शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे- पाटील यांनी दिली.
रविवारी सातारा येथे एका कार्यक्रमानिमित्त पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
बानुगडे पाटील पुढे म्हणाले, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत शिवसेनेच्या दोन संचालकांचा प्रवेश झाला. ही पक्षासाठी अत्यंत चांगली बाब आहे. सातारा जिल्ह्यात ७० ते ७५ टक्के शिवसेनेच्या शाखा असून कोरोना काळात ४८१ शाखांचा ऑनलाइन शुभारंभ करण्यात आला, याबाबतची माहिती आदित्य ठाकरे यांना दिल्यानंतर भविष्यकाळात येणारी प्रत्येक निवडणूक शिवसेनेने स्वबळावर आणि धनुष्यबाण या चिन्हावर लढवण्याच्या सूचना ठाकरे यांनी यावेळी दिल्या. निवडणुकांबाबत आरक्षण जाहीर झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत ठोस भूमिका घेण्यात येणार असून तत्पूर्वी मतदार संघ निहाय बैठका सुरू असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांना पक्षाच्यावतीने देण्यात आली.
युवासेना बाबत माहिती बानगुडे- पाटील म्हणाले, युवा सेनेचे एक वरिष्ठ समिती काही महिन्यांपूर्वीच सातारा जिल्ह्यात येवून गेली. इच्छुक सणाऱ्या पदाधिकार्‍यांच्या मुलाखती घेण्यात आल्या असून ज्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल संपला आहे त्याठिकाणी नवीन पदाधिकार्‍यांच्या निवडी  लवकरच करण्याच्या सूचना आदित्य ठाकरे यांनी दिल्या आहेत. यावेळी झालेल्या चर्चेत ठाकरे यांनी सातारा जिल्ह्यासाठी आणखी काही निधीची आवश्यकता असल्यास मला ताबडतोब पत्र द्या अशा सूचना त्यांनी पक्षाला केल्या आहेत.