maharashtra

लिफ्टचा बहाणा करून मैत्रिणीच्या पतीकडून अत्याचार

तरुणास अटक

लिफ्टचा बहाना करून दुचाकीवरून नदीकाठी शेतात नेऊन जबरदस्तीने तरुणीवर तिच्या मैत्रिणीच्या पतीने अत्याचार केला. ही धक्कादायक घटना साताऱ्यात घडली असून या प्रकरणी तरुणाला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे

सातारा : लिफ्टचा बहाणा करून दुचाकीवरून नदीकाठी शेतात नेऊन जबरदस्तीने तरुणीवर तिच्या मैत्रिणीच्या पतीने अत्याचार केला. ही धक्कादायक घटना साताऱ्यात घडली असून या प्रकरणी तरुणाला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित तरुणी साताऱ्यातील राहणारी असून ती 19 वर्षाची आहे. तिच्या कुटुंबीयांनी दुसरीकडे भाड्याने खोली घेतली होती. 12 फेब्रुवारी शिफ्टिंग सुरू होते. त्यामुळे रात्री पावणे बारा वाजता ती तरुणी भाड्याने घेतलेल्या नव्या घरी जाण्यासाठी निघाली. त्यावेळी तिच्या मैत्रिणीच्या पतीने तुला लिफ्ट देतो घरी सोडतो, असे सांगून पीडित तरुणीला दुचाकी वर घेतले. त्या तरुणाने पीडित तरुणीला दुचाकी वर बसवून वर्ये तालुका सातारा गावाजवळ असलेल्या वेण्णा नदीकडे जबरदस्तीने नेले. नदीकाठी असलेल्या एका शेतात नेऊन पीडित तरुणीवर त्याने बलात्कार केला. तुझे वडील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत हे लक्षात ठेव. कोणाला सांगितले तर माझ्याशी गाठ आहे, अशी धमकी त्याने पीडित तरुणीला दिली. त्यानंतर दीड वाजता पीडित तरुणीला त्याने तिच्या घराजवळ सोडले.
या प्रकारानंतर ती तरुणी भयभीत झाली होती. आपण हा प्रकार जर कोणाला सांगितला तर आपली इज्जत जाईल, या भीतीने महिनाभर तिने हा प्रकार कोणाला सांगितला नाही. परंतु तिच्यावर झालेल्या अन्यायाने तिला स्वस्थ बसू दिले नाही. शुक्रवार दिनांक 3 मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजता तिने शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. नाराधम आरोपी पीडितेच्या मैत्रिणीचा पती आहे. पोलिसांनी तातडीने तक्रारीची दखल घेऊन संबंधित तरुणाला अटक केली आहे.