maharashtra

अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा


One person injured in an accident
सातारा येथे अज्ञात दुचाकी चालकांनी पायी चालत जात असणाऱ्या एकाला धडक देऊन त्यात त्याला जखमी केल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : सातारा येथे अज्ञात दुचाकी चालकांनी पायी चालत जात असणाऱ्या एकाला धडक देऊन त्यात त्याला जखमी केल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ६ जुलै रोजी साडेदहा ते पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास सातारा येथील बस स्थानक ते पारंगे चौक मार्गावर सागर राजेंद्र भुतकर, रा. सदरबझार, सातारा हा पायी चालत जात असताना अज्ञात दुचाकी चालकांनी त्याला धडक देऊन जखमी केल्याची तक्रार राजेंद्र पुरुषोत्तम भुतकर यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे.