maharashtra

अज्ञातांकडून वृद्धाची सुमारे 80 हजारांची फसवणूक


वृद्धाची सुमारे 80 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन अज्ञातांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा : वृद्धाची सुमारे 80 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन अज्ञातांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन अज्ञातांनी वृध्दाला ’आम्ही पोलीस आहे. अंगावर एवढे दागिने घालू नका. आम्ही ते पुडीत बांधून देतो,’ असे सांगून हातचलाखीने संशयित दोन अनोळखींनी वृध्दाची फसवणूक केली. यावेळी चोरट्यांनी सोन्याची चेन, अंगठ्या असा 80 हजार 500 रुपयांचे दागिने घेतले. चोरट्यांनी दागिने बांधून न देता त्याऐवजी दगड रुमालात बांधून देवून फसवणूक केली. ही घटना दि. 30 नोव्हेबर रोजी आदर्श कॉलनी परिसरात घडली असल्याचे तक्रारीत मधुकर संभाजी गायकवाड (वय 74, रा.शाहूपुरी) यांनी म्हटले आहे.