सातारा जिल्ह्यात अखेर ओमायक्रॉनचा शिरकाव
युगांडावरून फलटणमध्ये आलेल्या तिघांचा अहवाल बाधित
सातारा जिल्ह्यात कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे. फलटण शहरामध्ये आठ दिवसांपूर्वी युगांडा येथून आलेल्या एकाच कुटुंबातील तिघांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात अखेर ओमायक्रॉनने एन्ट्री केली असून या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.
सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे. फलटण शहरामध्ये आठ दिवसांपूर्वी युगांडा येथून आलेल्या एकाच कुटुंबातील तिघांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात अखेर ओमायक्रॉनने एन्ट्री केली असून या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.
सातारा जिल्ह्यातील फलटण शहरामध्ये आठ दिवसांपूर्वी युगांडा येथून एक कुटुंब आले आहे. या कुटुंबातील पती, पत्नी आणि दोन लहान मुले कोरोना बाधित आढळली होती. या कुटुंबाचे नमुने पुणे येथील एनआयव्ही प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले होते.
त्याचा अहवाल शनिवारी प्राप्त झाला असून, या कुटुंबातील तिघांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा आरोग्य प्रशासन अलर्ट झाले असून फलटण शहरात विविध उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे.


