maharashtra

विसावा नाका परिसरातून दुचाकीची चोरी


विसावा नाका परिसरातून दुचाकीची चोरी झाल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

सातारा : विसावा नाका परिसरातून दुचाकीची चोरी झाल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दोन डिसेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान विसावा नाका येथील गोवर्धन अपार्टमेंट च्या पार्किंग मध्ये लावलेली श्वेता शिवाजी शिंगटे यांची हिरो स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक एमएच 11 सीएक्स 4450 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस हवालदार मेचकर अधिक तपास करीत आहेत.