maharashtra

दुचाकीची चोरी


theft of two wheeler
घरासमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची फिर्याद कोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

सातारा : घरासमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची फिर्याद कोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 6 नोव्हेंबर 2021 रोजी साडेबारा वाजल्यापासून ते 13 नोव्हेंबर 2021 पर्यंत सनी विजय मोरे (वय 38, राहणार विद्याधन, देसाई पेट्रोल पंप शेजारी, कोरेगाव, ता. कोरेगाव) यांची घरासमोर पार्क केलेली एक्टिवा ही दुचाकी क्रमांक एम एच 11 एजे 2088 अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची फिर्याद कोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस नाईक हादगे करीत आहेत.