एकाचे नुकसान केल्याप्रकरणी एकावर लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : एकाचे नुकसान केल्याप्रकरणी एकावर लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 7 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री दीड ते सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान प्रताप हनुमंत धुमाळ राहणार आदर की तालुका फलटण याने दीपक शिवाजी नलगे राहणार कापशी तालुका फलटण यांच्या गट नंबर 471 मधील शेत जमिनीमध्ये अनाधिकृत प्रवेश करून 51 आंब्याची झाडे, बारा पेरूची झाडे, तीन सीताफळ आणि एक फणसाचे झाड अशी एकूण 67 झाडे तोडून शेताची ठिबक तसेच मोटारीचा गोटा पाईप यांचे नुकसान केल्याप्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक मदने करीत आहेत.


