मर्ढे ता.सातारा येथे दि. 30 रोजी बंद घरफोडी करुन चोरट्यांनी सुमारे 5 लाख रुपये किंमतीच्या दागिन्यांवर डल्ला मारला असल्याची माहिती समोर आली आहे.
सातारा : मर्ढे ता.सातारा येथे दि. 30 रोजी बंद घरफोडी करुन चोरट्यांनी सुमारे 5 लाख रुपये किंमतीच्या दागिन्यांवर डल्ला मारला असल्याची माहिती समोर आली आहे.
अनिल मधुकर शिंगटे (वय 23, रा.मर्ढे) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
चोरट्यांनी घराचे कुलुप तोडून घरातील कपाटातून सोने, चांदी व रोख रक्कम असा सुमारे 5 लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला. दरम्यान, चोरटे दोघेजण असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.


