maharashtra

विषारी औषध प्राशन केलेल्या युवतीचा मृत्यू


Death of a young woman who consumed poisonous medicine
विषारी औषध प्राशन केलेल्या युवतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद मेढा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

सातारा : विषारी औषध प्राशन केलेल्या युवतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद मेढा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सर्जापूर तालुका जावली येथील यामिनी विजय मोहिते वय 19 या युवतीने विषारी औषध प्राशन केल्याने तिला सातारा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर पुढील उपचारासाठी तिला ससून हॉस्पिटल पुणे येथे दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. याबाबतची खबर ससून हॉस्पिटलचे डॉक्टर शुभम देशमुख यांनी मेढा पोलीस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास पोलीस नाईक रोकडे करीत आहेत.