वृद्धेस जखमी केल्याप्रकरणी अज्ञात दुचाकी चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : वृद्धेस जखमी केल्याप्रकरणी अज्ञात दुचाकी चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 22 जून 2022 रोजी पाच वाजण्याच्या सुमारास गोडोली ते पोवई नाका जाणाऱ्या रस्त्यावर शारदा वसंत साळुंखे वय 62, रा. मरळी, ता. पाटण ही वृद्धा रस्ता क्रॉस करीत असताना अचानक एका अज्ञात मोटरसायकल चालकाने त्यांना पाठीमागून धडक दिली. या धडकेत शारदा साळुंखे यांच्या डोक्यात दुखापत झाली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात मोटरसायकलच्या चालकावर गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस हवालदार कारळे अधिक तपास करीत आहेत.


