maharashtra

मल्टीपर्पज हॉल समोर लावलेल्या दुचाकीची चोरी


Theft of a bike parked in front of the multipurpose hall
मल्टीपर्पज हॉल समोर लावलेल्या दुचाकीची अज्ञाताने चोरी केली असल्याची फिर्याद वडूज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : मल्टीपर्पज हॉल समोर लावलेल्या दुचाकीची अज्ञाताने चोरी केली असल्याची फिर्याद वडूज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 22 जुलै रोजी संध्याकाळी सहा ते रात्री साडेदहा वाजण्याच्या दरम्यान म्हासुर्णे, तालुका खटाव येथील संभाजी राजे मल्टीपर्पज हॉल समोर पार्क केलेली वीस हजार रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम एच 11 बीसी 3011 ही कुणीतरी अज्ञाताने चोरून नेली असल्याची फिर्याद वडूज पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कारंडे करीत आहेत.