मद्यधुंद अवस्थेत गावातीलच एका महिलेच्या डोक्यात कोयत्याने वार करुन त्यानंतर आरोपीने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्त्या केल्याची घटना पानस करहर गावात घडली आहे. या गुन्ह्याची नोंद कुडाळ पोलीस दूरक्षेत्रात झाली आहे.
सातारा : मद्यधुंद अवस्थेत गावातीलच एका महिलेच्या डोक्यात कोयत्याने वार करुन त्यानंतर आरोपीने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्त्या केल्याची घटना पानस करहर गावात घडली आहे. या गुन्ह्याची नोंद कुडाळ पोलीस दूरक्षेत्रात झाली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी, मुंबईची गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला शंकर भीमराव पिसाळ (रा. पानस, ता. जावली) हा आज दि. 7 रोजी मद्यधुंद अवस्थेत गावातीलच सुरेखा प्रकाश पवार (वय 35) यांच्या घरात घुसला. त्यावेळी सुरेखा पवार या त्यांच्या घरात स्वयंपाक बनवित होत्या. दारुच्या अंमलाखाली असलेल्या शंकर पिसाळने नशेतच सुरेखा पवार यांच्या डोक्यात कोयत्याने दोनवेळा वार केले. वार वर्मी बसल्याने सुरेखा पवार या गंभीर जखमी झाल्या. यानंतर पश्चाताप झाल्याने शंकर पिसाळ हा त्याच्या घरी गेला आणि घरातच त्याने गळफास घेवून आत्महत्त्या केली. या घटनेने पानस करहर परिसरात खळबळ उडाली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास अमोल माने करीत आहेत.


