फलटण शहर परिसरातून सुमारे बारा लाखांची तांब्याची तार चोरीस गेल्याची फिर्याद फलटण शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सातारा : फलटण शहर परिसरातून सुमारे बारा लाखांची तांब्याची तार चोरीस गेल्याची फिर्याद फलटण शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 2 डिसेंबर ते 16 डिसेंबर दरम्यान लक्ष्मीनगर, ता. फलटण येथे असलेले तीन ट्रान्सफॉर्मर फोडून त्यामधील 1791 लिटर ऑइल सांडून नुकसान करून व ट्रान्सफॉर्मर मधील 2400 किलो वजनाची तांब्याची वायर अज्ञात चोरट्याने चोरून गेली आहे. याबाबतची फिर्याद अनिरुद्ध आत्माराम निमकर रा. बारामती, ता. बारामती, जि. पुणे यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. अधिक तपास पोलीस नाईक लावंड करीत आहेत.


