maharashtra

आरळे येथून युवक बेपत्ता


आरळे येथून युवक बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

सातारा : आरळे येथून युवक बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 3 फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आरळे, ता. सातारा येथील राहत्या घरातून आसिफ बंदेनवाज शेख हा फोटो काढायला सातारा येथे जातो, असे सांगून कुठेतरी निघून गेला आहे. याबाबतची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून पोलीस नाईक घोरपडे अधिक तपास करीत आहेत.