maharashtra

पत्रकार राहुल तपासे यांना जिवे मारण्याचा प्रयत्न

भुईंज पोलीस ठाण्यात तिघाविरोधात गुन्हा

Attempt to kill journalist Rahul Tapase
येथील पत्रकार राहुल तपासे यांच्या ब्रिजा कारला फॉर्च्युनरने धडक देऊन त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात तीन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. रात्री उशीरा दौंड तालुक्‍यातील एकास अटक करून अन्य दोनजणांना ताव्यात घेण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे.

सातारा : येथील पत्रकार राहुल तपासे यांच्या ब्रिजा कारला फॉर्च्युनरने धडक देऊन त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात तीन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. रात्री उशीरा दौंड तालुक्‍यातील एकास अटक करून अन्य दोनजणांना ताव्यात घेण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.३० मे रोजी १२.४० वाजण्याच्या सुमारास रायगाव, ता जावली गावच्या हद्दीत पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून  पत्रकार राहुल तपासे, रा. गुरुवार पेठ सातारा हे आपल्या ब्रिजा कार क्रमांक एम. एच.११ बीझेड १५१९ मधून सातारा येथे येत असताना तीन अज्ञात इसम फॉर्च्युनर कार क्रमांक एम. एच. १४ इएच ९ मध्ये दारू पीत बसले होते. राहुल तपासे यांनी त्यांच्याकडे पाहिल्यामुळे त्याचा राग मनात धरून त्या इसमांनी फॉर्च्युनरने कारला धडक देऊन तपास यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर राहुल तपासे यांनी घडलेला प्रकार सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे व सातारा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांना सांगितला. या दोघांनीही तपासे यांच्या पाठीशी उभे राहून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल व वाईच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शितल जानवे- खराडे यांच्याशी चर्चा केल्यानंतर भुईज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला व तातडीने संबंधीत संशयीत यांच्यापर्यंत भुईज पोलीस पोहचून गुरूवारी रात्री उशीरा दौंड तालुक्‍यातील एकास अटक करून अन्य दोनजणांना ताव्यात घेण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे.
दरम्यान या घटनेनंतर राहुल तपासे यांच्या पाठीशी जिल्हा पत्रकार संघ खंबीरपणे उभे राहिल्यानंतर काय होवू शकते, याचा प्रत्यय सर्वसामान्यांना आला. पोलिस संशयिताकडे कसून चौकशी करत असून इतर दोघेजण कोण आहेत? त्यांचा नेमका उद्देश काय होता? संशयित आरोपीकडील कार कोणाच्या मालकीची आहे? याची पोलिस माहिती घेत आहेत. दरम्यान, आरोपींना अटक करण्यासाठी भुईज पोलीस ठाण्यात वाईच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शितल जानवे खराडे व भुईज पोलीस स्टेशनचे सपोनि आशिष कांबळे, पी. एस. आय निवास मोरे, पीएसआय रत्नदीप भंडारे आदी रात्री उशीरापर्यंत होते.