maharashtra

मायणी - विटा मार्गावर अपघातात एकाचा मृत्यू


One killed in Mayani-Vita road accident
मायणी - विटा मार्गावर दुचाकीस्वाराचा अपघात होऊन झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला.

सातारा : मायणी - विटा मार्गावर दुचाकीस्वाराचा अपघात होऊन झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विजय भाऊराव चौगुले वय २४, रा. वेळापूर, ता. माळशिरस हा दि. १९ जानेवारी रोजी ८.३० वाजण्याच्या सुमारास मायणी- विटा मार्गावरून दुचाकीवरुन जात असताना मायणी पासून तीन किलोमीटर अंतरावर त्याच्या दुचाकीचा अपघात होऊन त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.