मारहाण प्रकरणी करंडी येथील पाच जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : मारहाण प्रकरणी करंडी येथील पाच जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २९ रोजी दहा वाजण्याच्या सुमारास करंडी येथे तेथीलच शशिकांत किसन जाधव प्रवीण लक्ष्मण जाधव, अविनाश लक्ष्मण जाधव, स्वप्निल तात्यासो जाधव, अजिंक्य दत्तात्रय जाधव, आकाश आत्माराम जाधव यांनी लाकडी दांडक्याने व दगडाने मारहाण केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.


