maharashtra

सातारा डि.बी. पथकाची दमदार कारवाई; चोरट्यासह 10 मोटारसायकली हस्तगत


Satara D.B. The forceful action of the squad; 10 motorcycles seized with thieves
सातारा शहरासह ठिकठिकाणाहून दुचाकी चोरणार्‍या आशुतोष दिपक भोसले (वय 22, मूळ रा.कुशी ता.सातारा सध्या रा. संभाजीनगर, सातारा) याला शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने (डीबी) अटक केली. संशयिताकडून तब्बल 10 दुचाकी जप्त करण्यात आल्या असून त्याने या दुचाकी चोरी करुन विकल्याचे समोर आले आहे.

सातारा : सातारा शहरासह ठिकठिकाणाहून दुचाकी चोरणार्‍या आशुतोष दिपक भोसले (वय 22, मूळ रा.कुशी ता.सातारा सध्या रा. संभाजीनगर, सातारा) याला शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने (डीबी) अटक केली. संशयिताकडून तब्बल 10 दुचाकी जप्त करण्यात आल्या असून त्याने या दुचाकी चोरी करुन विकल्याचे समोर आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सातारा शहर परिसरातून गेल्या काही महिन्यात दुचाकी चोरी होण्याचा सपाटा सुरु आहे. पोलिस चोरट्यांचा शोध घेत असताना संशयित आशुतोष भोसले याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे प्राथमिक चौकशी करुन तांत्रिक तपास केला असता त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली. संशयिताने सातार्‍यातील संभाजीनगर येथून दुचाकी चोरी केल्याचे कबुली दिल्यानंतर पोलिसही हादरुन गेले. कारण त्यानंतर त्याने आतापर्यंत 10 दुचाकी चोरी केल्याचे मान्य केले.
चोरीची कबुली दिल्यानंतर चोरीची वाहने जप्त करणे पोलिसांसमोर आव्हान बनले. त्यानुसार संशयिताकडे चौकशी केली असता त्याने विविध खोटी कारणे सांगून दुचाकी विकल्याचे सांगितले. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी चोरीच्या दुचाकी जप्त करण्यास सुरुवात केल्या. जप्त केलेल्या दुचाकींमध्ये पॅशन, स्प्लेंडर, ऍक्टीव्हा, बजाज सीटी, डिस्कव्हर, सीडी डिलक्स, होंडा पॅशन, होन्डा शाईन या वाहनांचा समावेश आहे.
दरम्यान, संशयिताने साथीदारासोबत भुईंज येथूनही दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे. ही कारवाई पोनि भगवान निंबाळकर, पोनि वंदन श्रीसुंदर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार समीर कदम, पोलिस हवालदार सुजीत भोसले, अविनाश चव्हाण, पंकज ढाणे, ज्योतीराम पवार, अभय साबळे, गणेश घाडगे, संतोष कचरे यांनी पार पाडली आहे.