महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून अज्ञात दोन चोरट्यांनी पोबारा केल्याची फिर्याद बोरगाव पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सातारा : महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून अज्ञात दोन चोरट्यांनी पोबारा केल्याची फिर्याद बोरगाव पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 4 डिसेंबर रोजी दुपारी 5.20 वाजण्याच्या दरम्यान वेणेगाव ते जावळवाडी जाणाऱ्या रस्त्यावर सुरेखा विकास जाधव रा. वेणेगाव, तालुका सातारा यांच्या गळ्यातील 15 ग्रॅम वजनाचे 50 हजार रुपये किंमतीचे मनी मंगळसूत्र अज्ञात मोटरसायकल वरील दोन अज्ञातांपैकी पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने जबरदस्तीने चोरून, तोडून नेले आहे. या घटनेची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात झाली असून सहाय्यक फौजदार शेख अधिक तपास करीत आहेत.


