वडगाव, ता. सातारा येथे वनवणवा प्रतिबंध सप्ताह अंतर्गत आज प्रचार, प्रसिद्धी करून वनवणवा प्रतिबंधक उपाय म्हणून सातारा तालुका वन विभागाच्या पुढाकाराने माहिती पत्रकांचे वाटप करून जनजागृती केली. यावेळी अनेकांनी पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ, अशी ग्वाही दिली.
सातारा : वडगाव, ता. सातारा येथे वनवणवा प्रतिबंध सप्ताह अंतर्गत आज प्रचार, प्रसिद्धी करून वनवणवा प्रतिबंधक उपाय म्हणून सातारा तालुका वन विभागाच्या पुढाकाराने माहिती पत्रकांचे वाटप करून जनजागृती केली. यावेळी अनेकांनी पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ, अशी ग्वाही दिली.
सध्या ग्रामीण तसेच डोंगरी भागांमध्ये वनवणवा लावण्याचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर वाढू लागले असून वणव्यामध्ये हजारो दुर्मिळ कीटक, पक्षी आणि औषधी वनस्पती नष्ट होऊन निसर्गाची फार मोठी हानी होते. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखावा यासाठी सातारा तालुका वन विभागाच्या पुढाकाराने आज मंगळवारी वन परिमंडळ रोहोट येथील वडगाव येथे वनवणवा प्रतिबंध सप्ताह अंतर्गत माहिती पत्रकांचे वाटप करून जनजागृती केली. यावेळी २०२१ मधील वणवामुक्त गाव प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
यावेळी वडगाव येथील सरपंच सूर्यकांत भिलारे, पोलीस पाटील संतोष कदम, सावली ग्रामपंचायतीचे सदस्य बाळासाहेब साळुंके, पाटेघर संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पांडुरंग शेलार, वनविभागाचे कर्मचारी राजाराम काशीद, मारुती माने, श्रीमती साधना राठोड, संतोष दळवी उपस्थित होते.


