maharashtra

सातारा हॉस्पिटल मधील मुख्याधिकाऱ्यांची सुमारे 63 लाखांची फसवणूक

चार जणांविरोधात गुन्हा दाखल

सातारा डायग्नोस्टिक सेंटर अँड मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल मधील मुख्याधिकाऱ्यांची सुमारे 63 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघा जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : सातारा डायग्नोस्टिक सेंटर अँड मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल मधील मुख्याधिकाऱ्यांची सुमारे 63 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघा जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा डायग्नोस्टिक सेंटर अँड मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, देवी कॉलनी, सदर बाजार, सातारा येथील निलेश भानुदास नाईक उर्फ इग्नसीन फर्नांडिस रा. न्यू सातारा नगर, वाई, ता. वाई याने हॉस्पिटलचा नोकर असतानाही मेडिकल मधील हेल्पर अजित रामचंद्र कुलकर्णी रा. यादोगोपाळ पेठ, सातारा याच्या मदतीने मेडिकल मधील सर्जिकल औषधे इंजेक्शनची वेळोवेळी सर्जिमेड एजन्सी चे मालक रविकिरण विलास पाटील रा. मंगळवार पेठ, सातारा यांच्याकडून खरेदी करून त्याची बिले मेडिकलच्या रेकॉर्डला जादा भावाने लावून, मेडिकल मधील सर्जिकल औषध इंजेक्शनची वेळोवेळी ग्राहकांना विक्री करून त्यातून येणाऱ्या रकमेचा अपहार करण्यासाठी हॉस्पिटल मधील संगणकात असलेल्या सॉफ्टवेअर मधील नोंदी डिलीट करून त्यामध्ये वेळोवेळी फेरफार करून, काउंटरला जमा झालेल्या रकमेपेक्षा कमी रक्कम त्याची पत्नी प्रिया नाईक हिला देऊन रजिस्टरला चुकीच्या नोंदी घेऊन तसेच प्रिया नाईक या हॉस्पिटलच्या नोकर असतानाही त्यांनी माई हॉस्पिटल मधून येणारा रोजचा कॅश तसेच इतर हॉस्पिटल व डायग्नोस्टिक सेंटर येथून येणारे असोसिएट चार्जेस हॉस्पिटलच्या खात्यावर जमा केले नाहीत. अशा पद्धतीने या चौघांनी संगनमत करून, कट रचून सुमारे 62 लाख 77 हजार 542 रुपयांची फसवणूक केली आहे. याबाबत सीईओ विक्रमसिंह सतीश शिंदे रा. सदर बाजार, सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मछले करीत आहेत.