वर्ये, ता. सातारा येथे एकाला मारहाण केल्याप्रकरणी चार जणांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : वर्ये, ता. सातारा येथे एकाला मारहाण केल्याप्रकरणी चार जणांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २८ रोजी ११.३० वाजण्याच्या सुमारास वर्ये गावच्या हद्दीत एका हॉटेलसमोर तेथीलच निलेश शिवाजी निकम याला सागर वसंत पठारे, निखिल पठारे, अजय संदीप पठारे व एक अनोळखी इसम सर्व रा. वर्ये, ता. सातारा यांनी शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.


