maharashtra

विसावा नाका परिसरातून दुचाकीची चोरी


Theft of two-wheeler from Visava Naka area
गोडोली, ता. सातारा येथील विसावा नाका परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : गोडोली, ता. सातारा येथील विसावा नाका परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ७ जानेवारी रोजी १० ते ६ वाजण्याच्या दरम्यान गोडोली, ता. सातारा येथील विसावा नाका परिसरातील गजानन प्लाझा बिल्डिंगच्या पार्किंग मधुन अज्ञात चोरट्याने दुचाकी क्रमांक एम.एच. ११ एएच ६९२५ चोरून नेल्याची तक्रार श्रीमंत शंकर कदम (वय ३८, रा. टी.एस. कल्पक विहार अपार्टमेंट, केसरकर पेठ, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.