maharashtra

सातारकरांनो घरपट्टी भरा आता ऑनलाईन

सातारा पालिकेच्या क्यूआर कोडचे लोकार्पण

Satarkars fill the house rent now online
सातारा पालिकेने स्वतःच्या खात्याचा क्यूआर कोड विकसित केला असून सातारकरांना घरपट्टी आणि पाणीपट्टी ची बिले ऑनलाईन भरण्याची सोय उपलब्ध झाली आहे. हद्दवाढ क्षेत्रातील नागरिकांना या सुविधेचा लाभ होणार आहे. अतिरिक्त मुख्याधिकारी पराग कोडगुले यांच्या हस्ते या सुविधेचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले.

सातारा : सातारा पालिकेने स्वतःच्या खात्याचा क्यूआर कोड विकसित केला असून सातारकरांना घरपट्टी आणि पाणीपट्टी ची बिले ऑनलाईन भरण्याची सोय उपलब्ध झाली आहे. हद्दवाढ क्षेत्रातील नागरिकांना या सुविधेचा लाभ होणार आहे. अतिरिक्त मुख्याधिकारी पराग कोडगुले यांच्या हस्ते या सुविधेचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले.
नागरिकांना ऑनलाईन पध्‍दतीने घर आणि पाणीपट्टी भरता यावी, यासाठी सातारा पालिकेने एका बँकेच्‍या मदतीने क्‍यूआर कोड तयार केला आहे. ही तांत्रिक सुविधा अद्ययावत करण्याचे काम सहा महिने सुरू होते. पालिकेकडून पुरविण्‍यात येणाऱ्या सुविधांपोटी पालिका नागरीकांकडून कर आकारते. या कराच्‍या नोटीसा बजावल्‍यानंतर नागरीक कर भरण्‍यासाठी पालिकेत तसेच इतर ठिकाणी उभारलेल्‍या सेवा केंद्रात करांचा भरणा करतात. एकाचवेळी कर भरण्‍यासाठी होणाऱ्या गर्दीमुळे नागरीकांना तासनतास त्‍याठिकाणी तिष्‍ठत बसावे लागते.
नागरीकांची हि गैरसोय टाळण्‍यासाठी तसेच डिजिटल इंडिया अभियानांतर्गत सातारा पालिकेने एका बँकेच्‍या मदतीने क्‍यूआर कोड तयार केला. हा कोड स्‍कॅन केल्‍यानंतर नागरीक ऑनलाईन पध्‍दतीने नेट तसेच डिजिटल पेमेंट ॲपच्‍या मदतीने आपल्‍या करांचा भरणा थेट पालिकेच्‍या खात्‍यात नावानिशी करु शकणार आहेत. हा भरणा केल्‍यानंतर नागरीकांना तात्‍काळ कर भरल्‍याची पावती देण्‍याची व्‍यवस्‍था पालिकेने उभारली आहे. यासाठी तयार केलेल्‍या क्‍यूआर कोडचे लोकार्पण पालिकेच्‍या छत्रपती शिवाजी सभागृहातील कार्यक्रमात करण्‍यात आले.