maharashtra

खंडोबाचीवाडी येथे एकास मारहाण; दोघांवर गुन्हा


One beaten at Khandobachiwadi; Crime on both
ठिबकचा कॉक का फिरवला. या कारणावरुन खंडोबाचीवाडी येथे दि. ९ एप्रिल रोजी मारहाणीची घटना घडली. याप्रकरणी मिनाक्षी नीलेश शिंदे रा. खंडोबाचीवाडी यांनी तक्रार दिल्यानंतर सातारा तालुका पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.

सातारा : ठिबकचा कॉक का फिरवला. या कारणावरुन खंडोबाचीवाडी येथे दि. ९ एप्रिल रोजी मारहाणीची घटना घडली. याप्रकरणी मिनाक्षी नीलेश शिंदे रा. खंडोबाचीवाडी यांनी तक्रार दिल्यानंतर सातारा तालुका पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.
या तक्रारीनंतर आबू गणपत शिंदे, अमोल आबू शिंदे दोघेही रा. खंडोबाचीवाडी यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. मारहाणीचा प्रकार ९ एप्रिल रोजी दुपारच्या चार वाजण्याच्या सुमारास खंडोबाचीवाडीतील एका शिवारात घडला होता. तसेच यावेळी संशयितांनी शिवीगाळ आणि दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली होती.