maharashtra

गर्दी मारामारी प्रकरणी अकरा जणांवर गुन्हा


गर्दी मारामारी केल्याप्रकरणी अकरा जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : गर्दी मारामारी केल्याप्रकरणी अकरा जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 19 फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक स्वप्निल शिवाजी कुंभार हे सातारा शहरातील मारवाडी चौक, राजपथ येथे कर्तव्य बजावत असताना मिरवणुकीतील जुन्या भांडणाच्या कारणावरून ओंकार शांताराम नलावडे राहणार मंगळवार पेठ सातारा, श्रेयस श्रीकांत खंडजोडे राहणार कामेरी फाटा सातारा, आनंद लक्ष्मण माने राहणार दिव्य नगरी सातारा अर्जुन रामदास साळुंखे राहणार सारखळ तालुका सातारा, योगेश गणेश गुरव राहणार दिव्य नगरी सातारा, राम मारुती कोकरे राहणार दिव्य नगरी सातारा व संदीप पवार, शुभम पवार, अनिकेत नलवडे, ओंकार नलवडे रोहन पवार सर्व रा. मंगळवार पेठ, बोगदा परिसर, सातारा हे एकमेकांना मारहाण करताना आढळून आले. या संबंधितांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार ढमाळ करीत आहेत.