maharashtra

निढळ येथे जानपीर उरूस उत्साहात


Janpir Urus is excited at Nidhal
निढळ, ता. खटाव येथे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला जानपीर उरूस उत्साहात साजरा झाला.

पुसेगाव : निढळ, ता. खटाव येथे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला जानपीर उरूस उत्साहात साजरा झाला.
दरवर्षी आषाढ महिन्यातील तिसऱ्या गुरुवारी निढळ मलवडी रस्त्यावर निढळ हद्दीत एक मोठे वडाचे झाड आहे. त्या वडाच्या झाडाजवळ हे जानपीर देवस्थान आहे. या वडाचे झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या फांद्या जमिनीजवळ आलेल्या आहेत. त्यामुळे या झाडाचे रूपांतर नैसर्गिक झोपाळ्यात झालेले दिसुन येते. लहान मुले या झाडावर झोपाळा खेळून आनंद घेतात. यावेळी निढळ व निढळ परिसरातील हिंदू मुस्लिम बांधव सहभागी होते. यावेळी भाविकांनी मलिदा चा नैवेद्य पीर बाबांना दाखवला. यावेळी या माळरानावर मोठे यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
जानपीर वर निढळ परिसरातील अनेक हिंदू-मुस्लिम भाविकांची श्रद्धा आहे. यावेळी हिंदू समाजाला मानाची काठी आणण्याचा मान आहे. या उरूसाच्या निमित्ताने परिसरातील हॉटेल व्यावसायिक, खेळणी व्यावसायिक व इतर अनेक व्यावसायिक आले होते.