maharashtra

नदीत बुडून एकाचा मृत्यू


क्षेत्रमाहुली, ता. सातारा येथील कृष्णा नदीत पाय घसरून पाण्यात पडून बुडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.

सातारा : क्षेत्रमाहुली, ता. सातारा येथील कृष्णा नदीत पाय घसरून पाण्यात पडून बुडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ४ रोजी ८ वाजण्याच्या सुमारास दिनकर रामचंद्र पवार वय ८०, राहणार श्रेत्रमाहुली, ता. सातारा कृष्णा नदी काठावर अंघोळ करण्यासाठी गेले असता अचानक पाय घसरून पाण्यात पडून त्यांचा मृत्यू झाल्याची खबर यशवंत शंकर पवार यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली.