स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी तसेच कनिष्ठ व उप अभियंत्यांची वेतनश्रेणी लागू करण्याच्या मागणीसाठी सातारा येथे बांधकाम भवनाच्या प्रवेशद्वारात सेवानिवृत्त स्थापत्य सहायक कृती समितीच्या वतीने अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.
सातारा : स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी तसेच कनिष्ठ व उप अभियंत्यांची वेतनश्रेणी लागू करण्याच्या मागणीसाठी सातारा येथे बांधकाम भवनाच्या प्रवेशद्वारात सेवानिवृत्त स्थापत्य सहायक कृती समितीच्या वतीने अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कारकून, मिस्त्री, हजेरी लिपिक इत्यादी तेरा पदे एकाकी असल्यामुळे त्यांना कोणत्याही पदोन्नतीची साखळी नाही. त्यांना पदोन्नतीच्या कोणत्याही वरिष्ठ पदाच्या परिक्षेला बसण्याचा अधिकार नाही. हा अन्याय दूर करण्यासाठी शासनाने अस्थाई आस्थापनेवरून कायम आस्थापनेवर कर्मचार्यांना प्रत्यार्पित करून पदोन्नतीच्या साखळी प्रवाहात आणण्यासाठी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या समकक्ष पदाची निर्मिती केली. वर्ग-3 व 4 च्या कर्मचार्यांच्या बाबतीतील सर्व प्रशासकीय अधिकार महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम 1981 नुसार परिमंडळ अधिक्षक अभियंता यांना प्रदान केलेले आहेत. त्यांनी सर्व कर्मचार्यांना शासन दप्तरी नव्याने सुरु केलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर दि. 1/1/1989 रोजी समाविष्ट केल्याशिवाय या कर्मचार्यांच्या पदोन्न्तांची साखळी निर्माण होत नाही. किंबहुना त्यांना पदोन्नती साखळीतील वरिष्ठ पदाच्या विभागीय परिक्षेला बसता येणार नाही. त्यामुळे दिनांक 18/06/1998 व 18/09/199 8 च्या अधिसुचना लागू होत नाहीत.
वर्ग -3 व 4 कर्मचार्यांचे प्रशासकीय सर्व अधिकार आपणांस असतांना मंत्रालयाच्या प्रशासकीय विभागाने खेळखंडोबा करुन नियमबाह्य निरर्थक पत्रे निर्गमित करुन दिनांक 14/11/2022 च्या पत्राद्वारे राज्यपाल महोदयांच्या निदर्शनास आणून दिला आहे. त्यामुळे समितीच्या दि. 14/11/2022 रोजीच्या निवेदनाप्रमाणे सेवानिवृत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांच्या मागण्या संदर्भात नियमानुसार कार्यवाही करून त्या संदर्भात त्यांना माहिती देवून आंदोलनापासून परावृत करण्याची कार्यवाही करावी, असे सुचित केले आहे. परंतु आपण कार्यवाही करीत नाहीत. झालेली चुक दुरुस्त करून महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम 1 9 81 मधील नियम 15 नुसार पदनामांतर करून स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर समाविष्ट करुन सामान्य प्रशासन व वित्तविभागाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार पहिला व दुसरा लाभ कर्मचार्यांना अनुक्षेम करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे.


