अपघातात जखमी केल्याप्रकरणी अज्ञात दुचाकी चालकावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : अपघातात जखमी केल्याप्रकरणी अज्ञात दुचाकी चालकावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 4 ऑगस्ट रोजी अकरा वाजण्याच्या सुमारास धिरसिंग सरदारसिंग चितोडिया वय 63 राहणार कोळकी तालुका फलटण हे साखरवाडी, तालुका फलटण गावच्या हद्दीतील लोखंडे वडापावच्या दुकानातून वडापाव खाऊन त्यांच्या दुकानाकडे निघाले असता चितोडिया यांच्या प्लेजर स्कूटी ला एका दुचाकी क्रमांक एम एच 11सीई 4435 वरील अज्ञात चालकाने भरधाव वेगात येऊन पाठीमागून जोराची धडक दिली. तसेच अपघात करून हा अज्ञात दुचाकीस्वार पळून गेला असल्याची फिर्याद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार डी.डी. कदम करीत आहेत.


