येथील एका डॉक्टरची ३५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मनीष अशोक अग्रवाल, मूळ रा. कोलकात्ता, सध्या रा. प्रतीकनगर, पुणे याला अटक करण्यात आली आहे.
सातारा : येथील एका डॉक्टरची ३५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मनीष अशोक अग्रवाल, मूळ रा. कोलकात्ता, सध्या रा. प्रतीकनगर, पुणे याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी सिटीस्कॅन मशीन साठी कर्ज मंजूर करून देतो असे सांगून मनीष अग्रवाल यांनी सातारा येथील एका प्रसिद्ध डॉक्टरची ३५ लाख रुपये उकळले होते मात्र सिटीस्कॅन मशीन न देता त्यांची त्याने फसवणूक केली होती. याबाबत संबंधित डॉक्टरने सातारा शहर पोलीस ठाण्यात मनिष अग्रवाल यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. मनीष अग्रवाल याने अनेक जणांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. नागपूर येथेही त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्यात नागपूर पोलिसांनी त्याला अटक केली होती. साताऱ्यात मनीष अग्रवाल याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी नागपूर येथे जाऊन त्याला अटक केली. त्याला सातारा येथे आणल्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.


