गोडोली, ता. सातारा येथे महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी फुलेनगर, ता. वाई येथील एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : गोडोली, ता. सातारा येथे महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी फुलेनगर, ता. वाई येथील एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २५ मे ते २७ मे दरम्यान गोडोली येथील एका संस्थेमध्ये अक्षय बजरंग जमदाडे, वय ३७, राहणार फुलेनगर याने एका महिलेशी जवळीक साधून तिचा दुचाकीवरून पाठलाग करून शारीरिक सुखाची मागणी करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले असल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात प्रकाश झाली आहे.


