भाजी मंडईतून अज्ञात चोरट्याने मोबाईलची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सातारा : भाजी मंडईतून अज्ञात चोरट्याने मोबाईलची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा तहसील कार्यालय समोरील भाजी मंडईतून अज्ञात चोरट्याने 35 हजार रुपये किंमतीचा आयफोन मोबाईल चोरी करुन नेला. ही घटना दि. 11 नोव्हेबर रोजी घडली असून याप्रकरणी सुरज राजेश घोरपडे (वय 27, रा.कोडोली, सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.


