maharashtra

सातारा बसस्थानकातील एसटी बसेस ना बसविल्या लोखंडी जाळ्या


Iron nets installed on ST buses at Satara bus stand
गेल्या काही दिवसांपासून एसटी बसेसवर होत असलेली दगडफेक पाहता खबरदारीचा उपाय म्हणून एसटी बसेसच्या काचांना आज लोखंडी जाळ्या बसविण्यात आल्या.

सातारा : गेल्या काही दिवसांपासून एसटी बसेसवर होत असलेली दगडफेक पाहता खबरदारीचा उपाय म्हणून एसटी बसेसच्या काचांना आज लोखंडी जाळ्या बसविण्यात आल्या.
गेल्या चार महिन्यांपासून एसटी बसेसचा संप सुरु आहे. मात्र, बसस्थानक आगार प्रशासनाने वाहक-चालकांना कामावर येण्याचे आवाहन केले होते. काही वाहक-चालक कामावर रुजू झाल्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवर एसटी बसेस धावू लागल्या. मात्र, काही समाजकंटकांकडून एसटी बसेसच्या काचांवर दगडफेक करण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. खबरदारीचा उपाय म्हणून आज सातारा बसस्थानकातील एसटी बसेसच्या काचांना लोखंडी जाळ्या बसविण्यात आल्या. बसस्थानकातून पहिली लोखंडी जाळी बसवलेली सातारा-वाई ही बस बाहेर पडली.