पाटण, ता. पाटण येथून घरकाम करणाऱ्या एका महिलेने ३५ हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याची तक्रार पाटण पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : पाटण, ता. पाटण येथून घरकाम करणाऱ्या एका महिलेने ३५ हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याची तक्रार पाटण पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १२ ते दि. १५ डिसेंबर दरम्यान वनिता संभाजी पाटील, वय ३५, रा. रेवणचार्य अपार्टमेंट, फ्लॅट नंबर ४, पाटण, ता. पाटण आणि त्यांच्या घरी घरकाम करणारी उज्वला सुनील कलकुटकी, रा. पाटण या दोघी घरी असताना दरम्यानच्या काळात वनिता पाटील यांचे ३५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने उज्वला कलकुटकी हिने चोरून नेल्याची तक्रार पाटण पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.


