maharashtra

विरोधकांना टीका करण्याशिवाय काम नाही

दरे गावात मुख्यमंत्र्यांनी घेतला विरोधकांचा समाचार

वर्षा ड्रग्ज माफियाचा अड्डा झालाय, या विरोधकांच्या टिकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

सातारा : वर्षा ड्रग्ज माफियाचा अड्डा झालाय, या विरोधकांच्या टिकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री म्हणाले, विरोधकांना काही काम नाही, रोज आरोप करताहेत. त्यांना आम्ही कामातुन उत्तर देतोय. त्यांनी बंद पाडलेले प्रकल्प आम्ही सुरू करतोय. इगो ठेवुन तुम्ही काममे बंद केलेली. असे राज्यकर्ते नसतात. अहंकारी वृत्तीने राज्य चालत नाही. त्यामुळे आम्ही त्याच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. त्यांना सकाळी उटल्यावर काही काम नसत, त्यामुळे ते बोलतात. आम्ही राज्यातील विकासाचे प्रकल्प पुढे नेतोय. यामुळे जे कोणी बोलताहेत त्यांना काही बोलायचं नाही.
अजित पवार गटाने आंदोलन केले, यावर मुख्यमंत्री नाराज होते? यावर बोलताना ते म्हणाले, काल आमची बैठक झाली. यात तिन्ही पक्षांच्या समन्वयाबाबत बैठक झाली, यासाठी चर्चा झाली. मराठा आरक्षणाच्या बाबतीत बोलणे झाले. शिवसेना- भाजपा, अजित पवार राष्ट्रवादी हे एक दिलानं काम करतील आणि येणाऱ्या लोकसभेत लोक आम्ही केलेले काम पाहुन राज्यात 45 जागांवर जिंकून दिल्याशिवाय राहणार नाहीत.
दिवस-रात्र एक करून मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देवू
मनोज जरांगे पाटील यांना मी धन्यवाद दिलेत. सरकार मराठा समाजाच्यासाठी टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देणार आहोत. शासनाच्या शब्दावर त्यांनी विश्वास ठेवला आहे. आम्ही दिवसरात्र एक करून कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देवू.