maharashtra

युवतींनी नवीन कला, कौशल्यात पारंगत व्हावे

खासदार श्रीनिवास पाटील : शिरवळ येथे समर्थ कृपा इन्स्टिट्यूटचे उद्घाटन

Young women should become proficient in new arts and skills
नव्या युगातील वाटचाल करताना शिरवळसारख्या निमशहरी ठिकाणी समर्थ कृपा इन्स्टिट्यूटने युवतींसाठी फॅशन डिझाईनिंग, ब्युटिशियन, ऍक्टिंग, डान्स आणि जर्नालिझम सारखे कोर्सेस उपलब्ध केले आहेत. युवतींनी नव्या युवकाची आव्हाने स्वीकारताना या नवीन कला, कौशल्यात पारंगत व्हावे, असे आवाहन खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.

सातारा : नव्या युगातील वाटचाल करताना शिरवळसारख्या निमशहरी ठिकाणी समर्थ कृपा इन्स्टिट्यूटने युवतींसाठी फॅशन डिझाईनिंग, ब्युटिशियन, ऍक्टिंग, डान्स आणि जर्नालिझम सारखे कोर्सेस उपलब्ध केले आहेत. युवतींनी नव्या युवकाची आव्हाने स्वीकारताना या नवीन कला, कौशल्यात पारंगत व्हावे, असे आवाहन खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.
शिरवळ, ता. खंडाळा येथील सातारा-पुणे महामार्गावरील शिरवळ स्टॉपजवळ असलेल्या पुण्याई कॉम्प्लेक्समध्ये सुरु करण्यात आलेल्या श्री समर्थ कृपा इन्स्टिट्यूटचे उद्घाटन खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खंडाळा पंचायत समितीचे सभापती राजेंद्र तांबे, माजी जि. प. सदस्या स्वाती बरदाडे, तोंडलचे सरपंच भीमराव जाधव, सामाजिक कार्यकर्ते शंकर साळुंखे, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष समीर काझी, ग्रामपंचायत सदस्य दिलीप गुंजवटे, श्रावणी साळुंखे आदी उपस्थित होते.
यावेळी खासदार पाटील यांनी त्यांच्या वैशिष्ट्य़पूर्ण शैलीत त्यांच्या कॉलेज जीवनापासून ते जिल्हाधिकारी पदापर्यंतचा प्रवास कथन केला. जीवनात कोणतीही कला अंगी असलीच पाहिजे, असे सांगून त्यांनी रोहिणी साळुंखे यांनी युवतींसाठी एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करुन दिले असून युवतींनी या विविध कोर्सेसचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.  
राजेंद्र तांबे यांनी देखील कोरोना कालावधीनंतर समाजापुढे अनेक आव्हाने असून ती पेलत पुढे जावे लागणार आहे. शिरवळसारख्या ठिकाणी आधुनिक कोर्सेस उपलब्ध झाले असून त्याचा युवक, युवतींना निश्चितपणे फायदा होईल, असे सांगितले.
इन्स्टिट्य़ूटच्या संचालिका रोहिणी साळुंखे यांनी उपस्थितांचे स्वागत करुन संस्थेची माहिती दिली. संस्थेत विद्यार्थिंनीसाठी शिष्यवृत्ती योजना, कोर्सेससाठी अत्यल्प शुल्क, हप्त्याने शुल्क भरण्याची सुविधा, कोर्स पुर्ण केल्यानंतर कर्ज व नोकरीसाठी सहाय्य करण्यात येणार असल्याचे साळुंखे यांनी सांगितले.