अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 18 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सातारा शहर परिसरात राहणारी एक अल्पवयीन मुलगी क्लासला निघाली होती. ती बुधवार नाका सातारा येथील रामलीला बिल्डिंगच्या जवळ आली असता दादू उर्फ राज श्रीमंत वैराट राहणार गेंडामाल नाका सातारा याने मोपेड गाडीवरून येऊन तिचा पाठलाग करीत तिचा विनयभंग केला. या प्रकरणी त्याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मुल्ला करीत आहेत.


