maharashtra

पाटणमध्ये अल्पवयीन, मतीमंद मुलीवर बलात्कार

संशयित 9 आरोपींना 12 तासातच अटक : पाटण तालुक्यासह जिल्हा हादरला

Rape of a minor, mentally retarded girl in Patan
अल्पवयीन व मतीमंद मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. नराधमांनी पिडीतेला बाहेर फिरायला व खायला देण्याच्या बहाण्याने नेवून हे कृत्य केले. याप्रकरणी पिडीतेच्या आईने पाटण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 9 संशयित आरोपींना 12 तासातच अटक केली असून या अत्यंत संतापजनक घटनेमुळे पाटण तालुक्यासह जिल्हा हादरला आहे.

पाटण : येथील अल्पवयीन व मतीमंद मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. नराधमांनी पिडीतेला बाहेर फिरायला व खायला देण्याच्या बहाण्याने नेवून हे कृत्य केले. याप्रकरणी पिडीतेच्या आईने पाटण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 9 संशयित आरोपींना 12 तासातच अटक केली असून या अत्यंत संतापजनक घटनेमुळे पाटण तालुक्यासह जिल्हा हादरला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पाटण येथील एका महिला 27 जानेवारी ते 18 फेब्रुवारी 2022 यादरम्यान तिच्या परीचयाच्या एका अल्पवयीन व मतीमंद मुलीचा गैरफायदा घेवून तिला बाहेर फिरायला नेण्याचे, पैसे व खाऊ खायला देण्याचे आमीष दाखवून तिला बाहेर घेवून गेली. तसेच या मुलीला पाटण व आजुबाजुच्या परीसरातील लोकांशी ओळख करून देत त्यांच्याशी शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. या परीसरातील 8 लोकांनी पिडीत अल्पवयीन व मतीमंद मुलीवर वेळोवेळी व वेगवेळ्या ठिकाणी नेवून वारंवार बलात्कार केला आहे.
याप्रकरणी पिडीत अल्पवयीन, मतीमंद मुलीच्या आईने दिले तक्रारीवरून पाटण पोलीस ठाण्यात गु.र.नं. 32 / 2022 भा.द.वि.स.कलम 366अ, 376 (2) (एल) (जे), (एन) 376(3), 376 (डी) 376 (डी. ए).370 (4), 34 लैगीक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4, 6, 17 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या गुन्ह्यातील सर्व 9 आरोपींची नावे निष्पन्न करून त्यांचा शोध घेत पोलिसांनी त्यांना 12 तासात अटक केली आहे. या गुन्ह्याचा प्राथमिक तपास पाटण पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक यांनी केला. पोलीस अधिक्षक सातारा यांच्या आदेशाने या गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस अधिकारी करीत आहेत.