येथील केसकर पेटेत असणाऱ्या एका मंदिरातील दानपेटीवर डल्ला मारत चोरट्याने त्यातील २५ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : येथील केसकर पेटेत असणाऱ्या एका मंदिरातील दानपेटीवर डल्ला मारत चोरट्याने त्यातील २५ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि.२७ फेब्रुवारी रोजी ७ ते दि. २८ फेब्रुवारी रोजी ९ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी सातारा येथील केसरकर पेठेत असणाऱ्या मयुरेश्वर मंदिराच्या लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून पंचवीस हजार रुपये असणारी दानपेटी चोरून नेल्याची तक्रार रुपेश प्रकाश पवार यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.


