सातारा तालुक्यातून दोन दुचाकींची चोरी झाल्याची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सातारा : सातारा तालुक्यातून दोन दुचाकींची चोरी झाल्याची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 15 जानेवारी रोजी दुपारी दोन ते साडेपाच वाजण्याच्या दरम्यान अंगापूर, तालुका सातारा येथील बैलगाडी शर्यत असलेल्या माळावरून श्रीकांत मोहन शेळके रा. शेळकेवाडी, ता. सातारा यांची हिरो स्प्लेंडर प्लस मोटरसायकल क्र. एमएच 11 बीएस 2493 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. याबाबतची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आले असून अधिक तपास पोलीस नाईक एस. के. पिसाळ करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत दिनांक 19 जानेवारी रोजी कणसे होंडा शोरूम सातारा येथून मंगेश मुकुंद जोशी वय 26, रा. मंगळवार पेठ, सातारा यांची तीस हजार रुपये किंमतीची दुचाकी क्रमांक 11 सीके 9668 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. याबाबतची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक पोळ करीत आहेत.


