पती-पत्नीला कोयत्याने व दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : पती-पत्नीला कोयत्याने व दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 2 मार्च रोजी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास जुन्या भांडणाच्या व जुन्या पोलीस केस च्या कारणावरून रोहित संजय देवकुळे व त्यांची पत्नी विशाखा रोहित देवकुळे यांना कोयत्याने व दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी सुरज राजू माने आणि आलम शेख दोघेही रा. सदर बाजार, सातारा यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मेचकर करीत आहेत.


