येथील विजय दिवस चौकात ऊसाने भरलेला ट्रक पलटी झाला. ट्रकचा एक्सल तुटल्याने ही घटना घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीविन हानी झाली नसून ट्रकचालक या अपघातातून सुखरूप बचावला आहे. दरम्यान, या घटनेने काही काळ शहरातील वाहतुकीवर परिणाम झाल्याचे दिसून आले.
कराड : येथील विजय दिवस चौकात ऊसाने भरलेला ट्रक पलटी झाला. ट्रकचा एक्सल तुटल्याने ही घटना घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीविन हानी झाली नसून ट्रकचालक या अपघातातून सुखरूप बचावला आहे. दरम्यान, या घटनेने काही काळ शहरातील वाहतुकीवर परिणाम झाल्याचे दिसून आले.
याबाबतची अधिक माहिती अशी की, पुसेसावळी ता. वडूज येथून शिराळा तालुक्यातील चांदोली परिसरात असलेल्या निनाईदेवी साखर कारखान्याकडे ऊसाने भरलेला ट्रक निघाला होता. मंगळवारी २८ रोजी दुपारच्या सुमारास हा ट्रक कराडमधील विजय दिवस चौकात आल्यानंतर अचानक ट्रकचा एक्सल तुटला. त्यामुळे ट्रकचे संतुलन बिघडून हा ट्रक रस्त्यावर पलटी झाला.
दरम्यान, याबाबतची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत चौकातील विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली. ट्रकचालक या अपघातातून सुखरूप बचावला आहे. त्यानंतर रस्त्यावर पडलेला ऊस अन्य वाहन बोलावून त्यामध्ये भरण्याचे काम उशिरा सुरु करण्यात आले.


