maharashtra

कीटकनाशक औषधांच्या पिशव्या चोरीचा गुन्हा उघड

२ लाख  ५८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

कोरेगाव, ता. कोरेगाव येथून कीटकनाशक औषधांच्या पिशव्या चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात कोरेगाव पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आले असून याप्रकरणी दोन जणांना अटक करत त्यांच्याकडून २ लाख  ५८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सातारा : कोरेगाव, ता. कोरेगाव येथून कीटकनाशक औषधांच्या पिशव्या चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात कोरेगाव पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आले असून याप्रकरणी दोन जणांना अटक करत त्यांच्याकडून २ लाख  ५८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ४ जानेवारी २०२३ रोजी कोरेगाव शहरातील कृषी भूषण नावाच्या दुकानाच्या गोडाऊनचे कुलूप तोडून आज प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी ५ लाख १६ हजार ७०७ रुपये किमतीच्या कीटकनाशक औषधांच्या पिशव्या चोरून नेण्याची तक्रार कोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. दरम्यान विशेष तपास पथकाने घटनास्थळी भेट देऊन तेथील आजूबाजूच्या लोकांकडे विचारपूस करून सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तपासामध्ये हा गुन्हा चार जणांनी केल्याचे उघडकीस झाले. त्यापैकी दोन जणांना अटक करून त्यांच्याकडून २ लाख ५८ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. या कारवाईत कोरेगाव पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना शिंदे, पोलीस अंमलदार सचिन साळुंखे, प्रमोद जाधव, समाधान शेडगे, अविनाश घाडगे, अमोल कणसे यांनी सहभाग घेतला. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी त्यांचे अभिनंदन केले.