maharashtra

हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी एकावर गुन्हा


हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ऋतिक उर्फ बाबा अजय जाधव वय 20, राहणार लक्ष्मी टेकडी, सदर बाजार, सातारा याला सातारा जिल्ह्यातून हद्दपार केलेले असताना तो भीमाबाई आंबेडकर नगर ते भुरके कॉलनी जाणारे रस्त्यावर जिल्ह्यात येण्याची कोणती पूर्वपरवानगी न घेता वावरत असताना आढळून आला. याप्रकरणी त्याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस नाईक भोसले अधिक तपास करीत आहेत.